पुणे : दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून आॅनलाईन प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दि. १४ जुलैपर्यंत चालणार असून, दि. १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत. केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एटीकेटीचे वेळापत्रक नंतर...महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीच्या दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सुविधेचा लाभ मिळतो. त्यानुसार त्यांना अकरावीत प्रवेश दिला जातो. मात्र, या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेनंतर स्वतंत्रपणे राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.हे प्रवेश होतील महाविद्यालय स्तरावर...किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम, गृहनिर्माण , व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाउस कोट्याचे प्रवेशतांत्रिक कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश. रात्र कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश, हिंदी व उर्दू माध्यमाचे प्रवेशअकरावी प्रवेशाचे वेळापत्रकदिनांकवेळप्रवेशप्रक्रिया९ ते १८ जूनसांय. ५ वाजेपर्यंतआॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे (भाग १ - अपूर्ण राहिलेला भाग पूर्ण भरणे व भरलेला नसल्यास भाग १ सह भाग २ भरणे) तसेच यापूर्वी भरलेल्या आॅनलाईन प्रवेश अर्जातील आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांमार्फत आॅनलाईन दुरुस्ती.१५ ते १८ जून सायं. ५ वाजेपर्यंतउच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा प्रवेशप्रक्रिया करणे व भरलेल्या जागा आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.२४ जूनसायं. ५ पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे.२५ ते २७ जूनस. १० ते दु. ४प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.२७ जूनसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-२ साठी आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.२ जुलैस. ११ दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.२ ते ४ जुलैस. ११ ते दु. ४दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.४ जुलैसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-३ साठी आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.९ जुलैस. ११तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.९ व १० जुलैस. ११ ते दु. ४तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. ११ ते १४ जुलैस. १० ते दु. ४प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क भरून त्यांचे प्रवेश निश्चित करणे.१५ जुलैइयत्ता अकरावीसाठीचे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू करणे.