पुणे : डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीरच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक सतीश आळेकर आणि नाट्यधर्मी पुरस्कार मुंबई फॅट्स थिएटर संस्थापक फैजे जलाली यांना जाहीर करण्यात आला आहे.आळेकरांच्या महानिर्वाण, मिकी आणि मेमसाहेब, महापूर अशा अनेक नाटकांनी रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला आहे. त्यांच्या अनेक नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरही झाले. तर फैजे जलाली या अभिनेत्री, शिक्षिका, लेखिका म्हणून कार्यरत आहेत. विविध विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे. भारतीय तसेच अनेक परदेशातील नाटकात भूमिका केल्या आहेत.तन्वीर सन्मान सोहळा दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी लेखक अरुण खोपकर आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे आळेकरांविषयी बोलणार आहेत.
रुपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान व नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर; ९ डिसेंबरला पुण्यात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:48 PM
तन्वीर सन्मान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक सतीश आळेकर आणि नाट्यधर्मी पुरस्कार मुंबई फॅट्स थिएटर संस्थापक फैजे जलाली यांना जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्देतन्वीर सन्मान पुरस्कार सतीश आळेकर, नाट्यधर्मी पुरस्कार फैजे जलाली यांना जाहीरयशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत होणार सोहळा