पुणे : पारदर्शक व्यवहार, उत्तम दर्जा, वेळेत ताबा यासाठी नावलौकिक असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्स या पुण्यातील आघाडीच्या बांधकाम कंपनीने यंदाच्या नवरात्रातील आपल्या भव्य गृह महोत्सवाची घोषणा केली आहे. सदर महोत्सवाचे हे १० वे वर्ष असून पुणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी घेवू इच्छिणारे ग्राहक कायमच या दरम्यान मिळणाऱ्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजनांमुळे या मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहत असतात.
या वर्षीच्या विशेष योजनेविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “गेली ९ वर्षे ग्राहकांनी आमच्या नवरात्रातील गृह महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दहाव्या वर्षाचे औचित्य साधत यावेळी आम्ही एक अभूतपूर्व अशी ‘१० – ९०’ योजना सादर करत आहोत. याअंतर्गत नवरात्राच्या ९ दिवसांमध्ये गोखले कंस्ट्रक्शन्सच्या कोणत्याही निवासी किंवा व्यावसायिक प्रकल्पात प्रॉपर्टी घेतल्यास केवळ १० टक्के रक्कम भरून उरलेली ९० टक्के रक्कम ही थेट प्रकल्प पूर्ण झाल्यावर ताबा घेण्याच्या वेळीच द्यायची आहे.”
शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी साकारात असलेल्या निवासी आणि व्यावसायिक संकुलासाठी अशा प्रकारची ग्राहकाभिमुख योजना प्रथमच सादर होत आहे. प्रत्येक नवरात्रीच्या गृह महोत्सवात ९ नवीन प्रकल्प सादर केले जातात. ही परंपरा कायम राखत यंदा देखील १० नवीन प्रकल्प सादर केले जातील. यात २ व्यासायिक आणि ८ निवासी संकुलांचा समावेश आहे. ही क्रांतिकारी आणि ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक अशी ‘१० – ९०’ योजना नव्याने सादर होत असलेल्या या १० प्रकल्पांबरोबरच सध्या निर्माणाधीन असलेल्या ३० प्रकल्पांवर देखील लागू असेल. ज्यामध्ये सिटी प्राईड कोथरूड समोर साकारात असलेल्या ‘गोखले बिझनेस बे’ या भव्य व्यापारी संकुलाचा देखील समावेश आहे.
गोखले कंस्ट्रक्शन्सचे शहरातील विविध निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प कर्वे नगर, करिष्मा सोसायटी जवळ कोथरूड, मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी, पटवर्धन बाग, एरंडवणा, प्रभात रस्ता, एमआयटी जवळील गिरीजा सोसायटी, सहकार नगर आणि औंध रोड येथे साकारात आहेत. याबरोबरच १० व्या नवरात्र गृह महोत्सवाचे औचित्य साधत या सिझन मध्ये सादर होणारे दोन नवीन गृह प्रकल्प १० महिन्याच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प करत असल्याची माहिती गोखले यांनी दिली.