बैठकीत २०२०-२१मधील पीक कर्जाच्या संवितरणातील प्रगती, वित्तीय वर्ष २०२१ -२२ साठी वार्षिक पत योजना, तसेच राज्य व केंद्र शासनाने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची चर्चा
करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बँकर्स समितीला संबोधित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सुद्धा राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १५१ वी तिमाही बैठकीस मार्गदर्शन केले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व आयुक्त देखील उपस्थित होते. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या अतिरिक्त सचिव वंदिता कौल व भारतीय रिझर्व बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे अधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
वर्षे २०२१च्या आगामी खरीप हंगामासाठी सुद्धा राज्यातील बँकांनी अधिकाधिक पीक कर्ज संवितरीत करावे यावर राज्य शासनाने भर दिला. बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक व महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय बँकर्स समितीचे निमंत्रक यू. आर. राव यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.