पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आरक्षित २५ टक्के जागावंरील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा आठ शैक्षणिक जिल्ह्यांच्या मुख्यालयांसह पिंपरी चिंचवड, नाशिक, मुंबई व ठाणे जिल्ह्यांतील महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये आॅलनाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी शनिवारी दिली.आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत, असे स्पष्ट करून माने म्हणाले, शिक्षण विभागातर्फे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नाशिक महानगरपालिका क्षेत्र व पनवेल तालुक्यातील प्रवेश १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. आरटीई प्रवेशासाठी शाळांनी ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी- निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाइंदर, नवी मुंबई महानगरपालिका, हवेली तालुका तसेच नागपूर, अमरावती, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर जिल्ह्यांतील शाळांना २३ ते ७ मार्च या कालावधीत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: February 08, 2015 1:29 AM