शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Video: पुण्यातील संतापजनक प्रकार! फुकट भाजी न दिल्याने गुंडांनी विक्रेत्याला पाया पडायला लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 7:21 PM

व्हायरल व्हिडिओमुळे आला प्रकार उघडकीस

पुणे : फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी विक्रेत्या तरुणाला मारहाण करुन पाया पडायला लावले तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

या संबंधी चार व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात या गुंडांनी एका तरुणाला त्याच्या आईसमोर कपडे फाटेपर्यंत मारहाण करुन पाया पडायला लावले आहे. बालाजीनगरमधील गुलमोहर अपार्टमेंटसमोर हा प्रकार घडलेला दिसून येत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवर रायडिंग करत आलेल्या गुंडांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात असल्याचे दिसून येत आहे. अन्य एका व्हिडिओत बालाजीनगरमधील गुंडाची टोळी हातात कोयते घेऊन जाताना दहशत माजवतो आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे पहायला मिळत आहे. अशा घटनांमुळे मुलांमध्ये भीती उरली नसून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना छेडणे, हत्यार दाखवणे धमकी देणे हे राजरोस सुरू आहे.त्यामुळे या गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित केला जातोय. सहकारनगर पोलीस स्टेशन व धनकवडी पोलीस चौकीतून नागरिकांना सांगितले जाते की तुम्ही तिथे राहू नका? त्यामुळे पोलिसांवर देखील आता या गुंडांची दहशत बसली आहे का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस सर्तक झाले असून त्यांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व या व्हिडिओची तपासणी करुन या गुंडांचा शोध सुरु केला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले की, यातील एका व्हिडिओत ५ गुंड दिसत असून दुसऱ्या व्हिडिओमध्ये ६ गुंड दिसत आहे. त्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यातील मारहाण झालेल्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असून त्याच्याकडून फिर्याद घेण्याचे काम सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे शहरात नेमके कोणाचे राज्य आहे, पोलिसांची भिती आता गुंडांना राहिली नसल्यानेच असे प्रकार वाढले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसvegetableभाज्याCrime Newsगुन्हेगारी