शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

Raksha Bandhan: ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हीच रक्षाबंधनाची भेट; पुण्यातील डाॅक्टर भावाकडून ६ बहिणींचे अनोखे रक्षण!

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 11, 2022 3:23 PM

रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आराेग्याचे रक्षण करू शकलाे हे खरे समाधान

पुणे : आज रक्षाबंधन. परंपरेनुसार बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि ओवाळणी म्हणून भाऊदेखील साडी किंवा दाग-दागिने गिफ्ट देताे. सिंहगड रस्त्यावरील डाॅक्टर भावाने काळाची पावले ओळखून गेली चार वर्षांपासून काही वस्तूंऐवजी आपल्या सर्व सहा बहिणींना रक्षाबंधनानिमित्त दीर्घायुष्याची अनाेखी भेट देत आहे. ते दरवर्षी रक्षाबंधनाला सर्व बहिणींच्या प्रतिबंधात्मक आराेग्य चाचण्या करत आहेत. त्यामुळे संभाव्य आजारांचे निदान झाले आणि त्यावर वेळीच उपचार केले. त्यामुळे दीर्घायुष्याची ही अनाेखी भेट विशेष ठरली आहे.

आपल्या सण-उत्सवाला विधायक स्वरूप देणाऱ्या या डाॅक्टरांचे नाव आहे डाॅ. गाेपालकृष्ण गावडे. त्यांना सहा माेठ्या बहिणी आहेत. पेशाने वैद्यकीय व्यावसायिक असल्याने प्रतिबंधात्मक आराेग्याविषयी ते जागरूक आहेत. मात्र त्यांनी हीच बाब बहिणींना वारंवार सांगितली तरी प्रतिबंधात्मक आराेग्य चाचण्यांबाबत त्या फारसे गांभीर्याने घेत नव्हत्या. ही समस्या हेरून डाॅ. गावडे यांनी चार वर्षांपूर्वी रक्षाबंधनानंतर ओवाळणी म्हणून साडी किंवा इतर भेटवस्तू ऐवजी ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हीच तुमची रक्षाबंधनाची भेट असेल असे बहिणींना निक्षून सांगितले आणि ही मात्रा लागू पडली.

यात ते गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॅप स्मिअर, स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी, हाडांचा ठिसूळपणा तपासण्यासाठी बोन डेन्सिटी, जनन इंद्रियांची आणि पोटातील इतर अवयवांची सोनोग्राफी, रक्तदाब, हिमोग्लोबीन, शुगर, कोलेस्टेरॉल, व्हिटॅमिन B13 आणि D3, थायरॉईड आदी १० तपासण्या दरवर्षी सर्व बहिणींच्या करून घेतात.

...म्हणून टळले हे धाेके

- या अनाेख्या उपक्रमातूनच मोठ्या बहिणीच्या गर्भाशयाला फायब्रॉईडची गाठ असल्याचे निदान झाले. त्यामुळेच तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी झाले होते. हे निदर्शनास आल्यानंतरच लगेचच औषधोपचार सुरू झाले आणि धाेका टळला.- दोन नंबरच्या बहिणीच्या ओव्हरीमध्ये छोटासा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्यावरही यथायोग्य उपचार केले.- तीन नंबरच्या बहिणीला बीपीचा त्रास असल्याचे उघडकीस आले. चार नंबरच्या बहिणीच्या हृदयाच्या तपासणीत 'मरमर' हा वेगळा आवाज ऐकू येत होता. तिच्या हृदयाची छोटी शस्त्रक्रिया करून ताेही दूर केला.- तीन बहिणींना व्हिटॅमिन B12, डी ३ ची कमतरता असल्याचे आढळले. तसेच आईचीही हाडे ठिसूळ झाली हाेती. या सर्वांवर याेग्य ते उपचार केल्याने त्या निराेगी व आनंदी जीवन जगत आहेत.

रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आराेग्याचे रक्षण करू शकलाे हे खरे समाधान

''रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांमधून आपल्या आया-बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेत असतो. जीवाचे रक्षण हे सर्वात मोठे रक्षण असते. त्यामुळे रक्षाबंधनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पेलायची असेल तर आपल्या बहिणींचे आरोग्य अधिक सुदृढ राहण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडील स्त्रियांनी प्राधान्यक्रमात स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटचे स्थान दिलेले असते. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही. हीच बाब हेरून मी रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आराेग्याचे रक्षण करू शकलाे हे खरे समाधान आहे. - डाॅ. गाेपालकृष्ण गावडे, सिंहगड राेड'' 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनPuneपुणेdoctorडॉक्टरSocialसामाजिकhospitalहॉस्पिटल