नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनच्या वतीने राबविण्यात येतील, असे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिले.
शिरूर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणीनिमित्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी भेट दिली.
ते म्हणाले की गावठी कट्टयांच्या विरोधात कारवाया पुणे ग्रामीण पोलिसांनी चांगल्या केल्या असुन याची पाळेमुळे परराज्यात असुन यास पायबंद घालणे हे मोठे आव्हान आहे.आगामी काळातही जिल्हयात गावठी कट्टयांच्या विरोधातील मोहिम अधिक व्यापक करण्यात येईल . शिरुर पोलिस स्टेशन वसाहतीची समस्या, अपुरे मनुष्यबळ हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले . तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मास्क मोहिम अधिक तीव्र करण्याची सुचना पोलिसाना दिल्या .
यावेळी बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,शिरुर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रविण खानापुरे,सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे,पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,सुनिल मोटे व अंमलदार उपस्थित होते.