उद्या (३१मार्च) दुपारी दोनवाजता सभेला सुरवात होणार आहे, साऱ्यांना सभेत हजेरी लावता यावी यासाठी सभासदांना गटनिहाय मोबाईल नंबर वरून नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. सभासदांना रजिस्ट्रेशन लिंक व क्यू आर कोड दिले आहेत त्याचा वापर करून सभासद या मीटिंगमध्ये सहभाग घेऊ शकतील.याच प्रमाणे छत्रपती शिक्षण संस्थेची वार्षिक सभा ही सकाळी दहा वाजता ऑनलाईन होणार आहे
(चौकट ) या मीटिंगसाठी एकावेळी२८ हजार सभासदांना भाग घेता येईल अशी व्यवस्था कारखान्याच्या वतीने केलेली आहे.
कारखान्याच्या परिसरात अशा पद्धतीचा कंट्रोल रुम व मनोरा उभा करण्यात आला आहे. चेअरमन ,यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी कारखान्याच्या कार्यालयात बसून सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देतील
कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. सभासद शेतात ,घरात ,प्रवासात कोठेही असतील तरी या मिटींगमध्ये सहभाग घेऊ शकतील. मीटिंग च्या लिंकमध्ये सभासदाने स्वतःचा कोड नंबर टाकल्यास त्याला मिटिंग मध्ये सहभाग घेता येईल.
--
कोरोनाच्या नियमांचे पालन सभासदांनी करावे. सभासदांनी एकत्रित येऊ नये आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणावरून सभेत भाग घ्यावा. प्रशासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधाचे पालन आपण सर्व करूया
- प्रशांत काटे,
चेअरमन, छत्रपती सह. सा. कारखाना