वडगाव कांदळी:- साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ,वडगाव कांदळी या संस्थेची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने नुकतीच पार पडली.
कोरोना पार्श्वभूमीवर सहकार खात्याच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते हे होते. यावेळी मुंबई कस्टमचे उपायुक्त बी.बी. लांडगे, सीए बाबू पवार, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अशोक बढे, ग्रामविकास ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते ,बाबाजी लांडगे आदींच्या उपस्थितीत पार पडली .या सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष सरपंच रामदास पवार, सचिव पोपट बढे, खजिनदार मंगेश घाडगे ,मार्गदर्शक बबनशेठ घाडगे ,दत्तूशेठ भोर ,संचालक नीलकंठ भोर, सतीश पाचपुते, नवनाथ थोरात, करीम इनामदार ,अतुल खेडकर, माऊली आडागळे ,ज्ञानेश्वर लांडगे ,लता भोर ,पूजा मुटके, व्यवस्थापक मच्छिंद्र भोर, पूजा भोर व ऑनलाईन पद्धतीने १२२ सभासद उपस्थित होते.