रांजणगाव सांडस : पुणे जिल्ह्यात दौंड व शिरूर तालुक्यातील भिमानदीकाठी मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या सुमारास शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे भीमा नदी काठी सकाळच्या सुमारास एका व्यक्तीचा अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . लक्ष्मण बापुराव सूर्यवंशी (रा. पारगाव ता. दौड़ जि. पुणे )असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवडाभरात भीमा नदीकाठी हा आठवा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच नदीपात्रात सात जणांचे मृतदेह आठवडाभरात मिळून आले होते. पुन्हा एकदा याच ठिकाणी मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रामचंद्र बापूराव सूर्यवंशी (वय 40 रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, रामचंद्र सूर्यवंशी यांना ज्ञानदेव ताकवणे यांचा फोन आला कि पारगाव-चे पुलावर ये तुझा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी नदीच्या कडेला पडलेला आहे. तेव्हा रामचंद्र सूर्यवंशी यांनी लगेच नागरगाव ता. शिरूर जि. पुणे गावचे हद्दी पारगाव पुलाजवळ नदीचे कडेला जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मृतदेह पडलेला त्यांना दिसला. त्यावेळी रामचंद्र सूर्यवंशी यांनी त्याचे जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या नाका तोंडातून फेस येत होता व त्याचे शरीर थंड झाले होते. भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्याने सूर्यवंशी यांनी याबाबत शिरूर पोलिसांना कळवले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे हे करत आहे.
यावेळी घटनास्थळी मांडवगण फराटा पोलीस चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे, संपत खबाले,योगेश गुंड, आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे,जालिंदर भोगाडे, डॉ. राहुल ताकवणे, खंडू ताकवणे, रवींद्र बोत्रे, रामचंद्र बोत्रे,नागेश चंद्राकर, आप्पा कदम, अंकुश शेलार, बापू बोत्रे आदी ग्रामस्थांनी नदीकाठी असलेला मृतदेह बाहेर काढण्याकामी पोलिसांना विशेष सहकार्य केले.