शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

निमोणेत आणखी एका शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:29 AM

शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील दुर्गेवस्ती येथे दोन महिन्यांपूर्वी एका युवा शेतक-याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असताना आज आणखी एका

निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील दुर्गेवस्ती येथे दोन महिन्यांपूर्वी एका युवा शेतक-याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असताना आज आणखी एका शेतक-याने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे मत आहे. पंचनाम्याच्या वेळी तशी चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली आहे.तुकाराम ऊर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे.यासंदर्भात शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाबूराव दोरगे हे आपल्या कुटुंबासमवेत दुर्गेवस्ती येथे आपल्या शेतालगत राहतात. मयत तुकाराम ऊर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे हेही लगतच आपल्या कुटुंबासमवेत राहतात. बुधवार (दि. ४) सकाळी ६.३०च्या दरम्यान फिर्यादी प्रवीण यांना आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला ते फास घेऊन लटकत असल्याचे दिसले. त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला खबर दिली असता, सदर घटनेचा शिरूर पोलिसांकडून पंचनामा केला.त्यांच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीमध्ये सहकारी सोसायटी, खासगी व्यक्तींचे कर्ज तसेच किडनी आणि मूतखड्याच्या आजाराने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पुढील कायदेशीर पूर्तता करण्यात आल्यानंतर उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरूर पोलीस स्टेशनचे पी.आय. राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अविनाश गायकवाड अधिक तपास करत आहेत.मयत तुकाराम ऊर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे पंचक्रोशीत एक कसलेले मल्ल आणि वस्ताद म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी लाल मातीत अनेक मल्ल घडविले. एवढ्या कणखर माणसाचा शेवट असा विदारक झाल्याने पंचक्रोशी तसेच कुस्ती क्षेत्रातील सर्व मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी