पुणे : स्वराज्य कोकण संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा कोकण कलाभूषण पुरस्कार हास्यसम्राट अंशुमन विचारे यांना देण्यात आला. तर क्रीडाभूषण पुरस्कार आर्य तांबे, उद्योजकभूषण पुरस्कार सुनील गायकवाड, शिक्षक भूषण पुरस्कार प्रदीप पवार, समाजभूषण पुरस्कार फकीर सोलकर, युवाभूषण पुरस्कार सुजित धाडवे आणि समाजभूषण पुरस्कार सुरेश डिके यांना प्रदान करण्यात आला.पुणे जिल्हा संपर्क प्रमुख रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी खेड मंडणगड दापोलीचे आमदार संजय कदम, पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यादव, अॅड. अभिजित गांधी, शिवसेना संघटक कविता आंब्रे, नगरसेवक बाबा धुमाळ, नितीन म्हामुणकर, अभिनेत्री अनुजा मुळे, संतोष गोपाळ, रूपेश पार्टे, मंडणगड नगराध्यक्ष राहुल कोकाटे, संदेश चिले आदी उपस्थित होते.सामंत म्हणाले, ‘‘पुण्यात कोकणी लोक एकत्र आणण्याचे काम जे तरुण पिढीने केले आहे ते खरच कौतुकास्पद आहे. कोकणातून शहरात येऊन एकत्र राहणे, सण-उत्सव साजरे करणे हे काम संघटनेने केले आहे.सूत्रसंचालन मनोज मोरे व राज भागाने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव राकेश कुळे यांनी केले. तर अमित खैरे यांनी आभार मानले.
अंशुमन विचारे यांना ‘कोकणभूषण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 3:16 AM