शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:01 AM

भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.

लोणी काळभोर - भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक पं. हदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मध्य प्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.पं. हदयनाथ मंगेशकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी ध्रुपद गायक पं. उदय भवळकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री. आदिनाथ मंगेशकर व श्री. सुरेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केली. डॉ. सुनील राय यांनी आभार मानले. एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधूर शहनाई वादनाने झाली.थोर गायकांचा सत्कार करून मी स्वत:चा सत्कार केला आहे असे मानतो. दहा वषार्पूर्वी संगीत कला अकादमी कशी असवी सात सुरांचे सात बंगले असावे. गार्डन असावे असे मी स्वप्न पाहिले होते. त्या संबंधी मी श्रीकृष्ण कर्वे गुरूजी यांच्याकडे बोललो होतो. त्याप्रमाणे ते जगातील एकमेव असे संगीत क्षेत्रातील अद्धितीय अकादमी डॉ. कराड यांनी प्रत्यक्षात साकार केले.- पं.हदयानाथ मंगेशकरसंगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती मिळते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याचे दिसत आहे. तो परिचय त्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आहे. भारतरत्न लतादीदींच्या आशीवार्दाने आज येथे संगीत कला अकादमी उभी राहिली आहे. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडणार आहे. संगीताच्या माध्यमातून जगात सुख, शांती व समाधान नांदेल.- प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड

टॅग्स :musicसंगीत