पुणे : पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत लष्कर ए तोयबासाठी काम करावे म्हणून पैसे मिळालेला मोहम्मद जुनेदला दापोडीतून अटक करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधून हे पैसे मिळाल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
जुनेद सोशल मीडियावरून जम्मू काश्मिरच्या लष्कर ए तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात आला होता. आज दुपारी जुनेदला पुण्यातील कोर्टोत हजर केले जाणार आहे. पुण्यातील हे दहशतवादी कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काल दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर जुनेद चौकशीत दोषी आढळल्याने रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. हा मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. जुनेदचे शिक्षण मदरशात झालं आहे.
लष्कर-ए-तैयबा-लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत इस्लामी मूलतत्त्ववादी व दहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.