श्री क्षेत्र महाळुंगे ग्रामपंचायत, कोरोना समिती व करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या गावातील व्यापारी व दुकानदारांची अँटीजन रॅपिड टेस्टिंग करण्यात आली.
प्रशासनाच्या या महत्वपूर्ण उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्री क्षेत्र महाळुंगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या चाचण्या घेण्यात आल्या. आज मंगळवारी सकाळी दहा वाजता नागरिकांची कोरोना तपासणी चाचणीला सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज सायंकाळ पर्यंत ३१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १८ जणांचा प्राथमिक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
श्री क्षेत्र महाळुंगे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व दुकानदार, व्यापारी, भाजी मंडई मधील भाजीवाले, फेरीवाले तसेच नागरिकांना कोरूना च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महाळुंगे ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व ग्राम विकास अधिकारी सोमनाथ पारासुर उपस्थित होते.
महाळुंगे येथील आरोग्य उपकेंद्रातील सेवकांनी व कर्मचाऱ्यांनी या तपासणी करण्यासाठी परिश्रम घेतले.
--
फोटो क्रमांक: २३ : २३ महाळुंगे दुकानदार
फोटो ओळी : महाळुंगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुपर स्पेडर अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आली.