त्यापैकी खांडजमधील १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले, तर मेखळीमधील ४, नीरावागजमधील १, सांगवीमधील १ असे बाहेरील गावातील पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तपासणीनंतर पॉझिटिव्ह रुग्णांना सिल्वर ज्युबली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारार्थ पाठवण्यात आले आहेत.
या सर्वेक्षणाचा शुभारंभ संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष किरण तावरे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक बन्सीलाल आटोळे, सरपंच रेखा वाघ, उपसरपंच शेखर जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. आप्पासो सोरटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी खरेदी विक्री संघाचे संचालक बापट कांबळे, पुणे जिल्हा शेगर धनगर महासंघ अध्यक्ष रवींद्र आटोळे, किरण आटोळे, प्रदीप माने, सूर्यकांत बर्गे, वैभव पवार, सुनील वाघ, विलास कांबळे, ग्रामसेवक हौशीराम पोंदुकले उपस्थित होते.
————————————————