जि प सदस्य दत्ता झुरंगे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, जेष्ठ विधिज्ञ विजय भालेराव यांच्या हस्ते सभापती किताब, चषक, सात हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक असे बक्षिस देण्यात आले. पुरंदर हवेलीचे आमदार व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी ( दि २३ ) सकाळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक बाळासो पायगुडे, नंदकुमार जगताप, स्पर्धेचे पहिले मानकरी सागर जगताप यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले. याप्रसंगी प्राचार्य नंदकुमार सागर, एम एस जगताप, कानिफनाथ आमराळे, प्रा नंदकुमार बारवकर, प्रा रेणुकासिंग मर्चंट इस्माईल सय्यद उपस्थित होते. प्रसिद्ध निवेदक महेश राऊत, शिवव्याख्याते निलेश जगताप आणि प्रशांत बोरावके यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
विजेते अनुली वाबळे हिने दुसऱ्या फेरीत स्पर्धा परीक्षा विषयावर विचार मांडले.
प्रसार माध्यमे यावर बोलत गोरक्षनाथ चव्हाण यांनी व्दितीय क्रमांकाचे पाच हजार रोख व स्मृतिचिन्ह पटकावले. तृतीय क्रमांकाचे तीन हजार व स्मृतिचिन्ह अॅड पुनम शिंदे यांनी पटकावले., माधुरी टिळेकर यांनी चतुर्थ क्रमांकाचे दोन हजार तर प्रा सागर चव्हाण आणि सानिका टिळेकर यांनी उत्तेजनार्थ एक हजारांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह मिळविले. मंडळाचे सचिव रविंद्रपंत जगताप, सदस्य नंदकुमार दिवसे, राजेंद्र जगताप, संजय काटकर, सोमनाथ भोंगळे, सागर घाटगे, अमित पवार, प्रवीण पवार, दिपक जगताप, चिन्मय निरगुडे, जीवन कड, अमृता म्हेत्रे यांनी संयोजन केले. रविंद्रपंत जगताप यांनी प्रास्ताविक तर संजय काटकर यांनी सुत्रसंचलन केले.
सासवड येथे कोण होणार सभापती स्पर्धेतील विजेते स्पर्धक व मान्यवर