शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

...अन्यथा जेलची हवा खावी लागेल : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:52 AM

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना १,५०० रुपयांची किंमत काय कळणार

दिघी : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना १,५०० रुपयांची किंमत काय कळणार, असा सवाल करीत लाडकी बहीण योजनेत कोणी खाेटं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलची हवा खावी लागेल, असा इशारा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. श्रीवर्धन येथील राऊत विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सुधाकर घारे,  माजी खासदार  आनंद परांजपे, माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, मुश्ताक अंतुले, दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक उपस्थित होते.  अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ दिला नाही.  एका पठ्ठ्याने स्वतःच्या पत्नीचे २८ फोटो काढून पैसे मिळविले, मात्र ते लक्षात आले. असे खोटे काम करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे सांगितले. या वेळी त्यांनी महिलांना सक्षम बनवण्याबरोबर त्यांची सुरक्षादेखील महत्त्वाची असल्याचे सांगत महिलांवर काही विकृत नराधम अत्याचार करतात. त्यांना फाशी किंवा जन्मठेप हीच शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टीका करण्याचा अधिकार नाही

या वेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. समाजात वेडेवाकडे बोलण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आपल्याला दिलेला नाही. आपण मत मांडू शकता, पण जाती किंवा पंथावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार दिलेला नाही. असे वक्तव्य करणाऱ्यांबद्दल कायदा आपलं काम करेल, असेही त्यांनी सांगितले. 

गुणवत्तेच्या जोरावर आम्हालाच न्याय मिळेल

आम्ही कायद्याच्या कसोटीवर निर्णय घेतला आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळाच्या चिन्हासह मान्यता दिली आहे. बुधवारी यावर सुनावणी असून, गुणवत्तेच्या जोरावर आम्हालाच न्याय मिळेल, असा विश्वास खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. सिनेटच्या निवडणुका रद्द करण्यात आल्याबाबत तटकरे यांनी नेते स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून तयार झाले आहेत. या निवडणुका वेळेत व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.  

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाAjit Pawarअजित पवार