करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात डॉ. आंबेडकर
जयंती साजरी करणाऱ्या मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी दरवर्षी आंबेडकर यांचे अनुयायी तसेच विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने १४ एप्रिल रोजी येतात. यंदाच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
याबाबत कार्यकर्त्यांची बैठक बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे शाखेचे निरीक्षक अभय महाजन यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. दुचाकी फेरी काढू नये. सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, व्याख्यान, गीतगायन असे कार्यक्रम आयोजित करू नये. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळा तसेच लष्कर भागातील अरोरा टॉवर्स येथील पुतळ्याच्या परिसरात जमू नये, असे आवाहन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी मंडळांनी बौद्धविहारात किंवा त्यांच्या भागात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.