पवनानगर : शेतकऱ्यांनी कॅशलेस व कार्डच्या माध्यमातून व्यवहार सुरू करावेत, असे आवाहन कृषी अधिकारी क्रांती पाटील यांनी शेतकरी दिनानिमित्त आयोजित येथील मेळाव्यात केले. माजी पंतप्रधान चरणसिंग यांचा जन्मदिवस हा देशात शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. येथे सिंडिकेट बॅँक तळेगाव शाखेच्या वतीने शेतकरी दिन साजरा करून शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पाटील म्हणाल्या, कॅशलेस व्यवहारासाठी शेतकऱ्यांना बॅँक सर्व प्रकारची मदत करेल. कॅशलेस व्यवहार शिकणे शेतकऱ्यांना भविष्यासाठी गरजेचे आहे.या वेळी बॅँक व्यवस्थापक ईश्वराप्पा, कृषी अधिकारी पाटील, प्रगतिशील शेतकरी किसनराव कालेकर यांचा बॅँकेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. या प्रसंगी एकनाथ निकम, ज्ञानेश्वर आडकर, चंद्रकांत कालेकर, संतोष ठुले, मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, दत्ता तुपे, विष्णू आडकर, गणेश ठाकर, राजेश दळवी, चंद्रकांत लोहर, मारुती सुतार, दत्ता घुगे, संजय कदम आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
कॅशलेस व्यवहाराचे शेतकऱ्यांना आवाहन
By admin | Published: December 24, 2016 12:26 AM