खेड तालुक्यातील घरगुती गणेशभक्तांसह गावनिहाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक आदर्श मंडळाची तसेच नगरपरिषद हद्दीत वाॅर्डनिहाय मंडळाची निवड करून खेड, आळंदी मतदार संघात स्पर्धा राबवण्यात येत आहे. स्पर्धेत मताधिकार १८ वर्षांवरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार नोंदवणे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश उत्सवात आकर्षक देखावे तयार करत आहेत. सामाजिक देखाव्यातून भाविक, आणि नातेवाईक, स्थानिक कार्यकर्ते, युवक मतदारपर्यंत मतदार नावनोंदणी, नाव वगळणे, मताधिकार बजवताना जात धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडताना कोणत्याही प्रलोभनाला आणि आमिषाला बळी न पडता मतदान करणे यांसारख्या सामाजिक जनजागृती विषयावर घरगुती गणेश उत्सव देखावे, सजावटीवर भर देणे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या जनजागृतीविषयक देखाव्यांबरोबरच निवडणूक आयोगाचा मतदार नावनोंदणी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम, मतदार नावनोंदणी नाव वगळणे यासाठी प्रसार आणि प्रचार करणे, मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाईन माध्यमाद्वारे जनजागृती करणे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर स्पर्धेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:16 AM