पुणे : स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या नावाने दरवर्षी छंदश्री या आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांना स्त्री व पुरुष विभागात फिरते पुरस्कार दिले जातात. यंदा या पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले दिवाळी अंक पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा दिवाळी अंकांचे १११ वे वर्ष असून, मराठी भाषेने जोपासलेली दिवाळी अंकांची ही स्पर्धा आहे. स्पर्धेत १५ उत्कृष्ट दिवाळी अंकाचे प्रथम क्रमांकाचे वेगवेगळे पुरस्कार तसेच दखलपात्र दिवाळी अंकांचे १८ पुरस्कार इन्फलक्स ग्रुप पुणे च्या वतीने सीएमडी श्री शिवाजीराव चमकिरे यांनी उत्कृष्ट दिवाळी अंकांचे द्वितीय क्रमांकाचे १३ पुरस्कार यंदा जाहीर केले आहेत. गतवर्षी २०० दिवाळी अंकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. पुरस्कार तयार असूनही ते कोरोनामुळे जाहीर करता आले नाहीत.
या स्पर्धेत वृत्तपत्र समूहाचे दिवाळी अंक, खासगी संस्थांचे दिवाळी अंक यांच्या संपादक व मालकांनी दोन अंक आणि रोख १०० रुपये पाठवावेत. आयोजक दिनकर शिलेदार, १३५१ शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता, नातूबाग पुणे २ येथे आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात. मार्च महिन्यात स्पर्धेचे पुरस्कार जाहीर केले जातील.