शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

नळजोडाबाबत धोरण आखावे

By admin | Published: October 01, 2015 12:48 AM

पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे अनधिकृत नळजोडांना दंड आकारण्यासाठी महापालिकेने ठोस धोरण आखावे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे अनधिकृत नळजोडांना दंड आकारण्यासाठी महापालिकेने ठोस धोरण आखावे. अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी ७०० ते १२०० रुपये आकारावेत. तसेच अधिकृत नळजोड देण्यासाठी झोपडीधारकांकडून ११०० रुपये अनामत रक्कम आकारण्यात यावी, अशी मागणी जिजाई प्रतिष्ठानाने केली आहे. यासंदर्भात आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही शंभर टक्के भरलेले नाही. त्यामुळे पुढील एक वर्षाचा विचार करून धरणातील पाणीसाठ्याचा वापर करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत पाणीबचत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने आतापासूनच नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. पाणीबचतीसाठी पाणीगळती रोखण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. शहरातील सर्व झोपडपट्ट्यांपासून महापालिकेने जनजागृतीची सुरुवात करावी. झोपडपट्ट्यांमध्ये गोरगरीब, दीनदलित, मागासवर्गीय आणि आदिवासी नागरिक राहत आहेत. हे नागरिक मोलमजुरीकरून आपले पोट भरतात. स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या नागरिकांवरअनधिकृत नळजोडातून मिळणाऱ्या पाण्यावर गुजराण करण्याची वेळ आली आहे. अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी महापालिका २३०० ते २५०० रुपये आकारत आहे. (प्रतिनिधी)