पुणे : बर्ड फ्लूच्या संदर्भात खबरदारी म्हणून वन विभागातर्फे पुणे परिसरातील पाठवठे आणि जलाशय शोधून त्या ठिकाणी वनरक्षकाची नेमणूक केल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.
बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यातील पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. त्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. वन विभागाने स्थलांतरित पक्ष्यांच्या जागा शोधून काढल्या आहेत. त्या ठिकाणी एक-एक वनरक्षकाची नेमणूकही केली आहे. त्याचा दररोज आढावा घेण्यात येईल. याबाबत वन परीक्षेत्र अधिकारी व तालुका पशूसंवर्धन अधिकारी समन्वय साधून कार्यवाही करीत आहेत.
वन विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात जलाशय किंवा पाणवठे असतील तर त्याची माहिती द्यावी. जलाशयात आजारी किंवा स्थलांतरीत पक्षी येत असतील, तर त्याचीही माहिती द्यावी.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग