पुणे : राज्यातील सर्वच अर्धवेळ ग्रंथपालांना ३०० विद्यार्थी संख्येवर (केंद्र सरकारी शाळेप्रमाणे) पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर नेमणूक करावी, अर्धवेळ ग्रंथपाल पदावर झालेली सर्व सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरावी व सर्वांना जुनी पेन्शन मिळावी, शाळा ग्रंथपालांना (पदवीधर) शिक्षक दर्जा देऊन पर्यवेक्षक पदानंतर हजेरी मस्टरला स्थान द्यावे, शाळा तेथे सुसज्ज ग्रंथालय व पूर्णवेळ ग्रंथपाल पद सक्तीने असावे आदी मागण्या अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथपालांकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. मान्यताप्राप्त, अनुदानीत, खासगी संस्थेच्या माध्यमिक शाळेमध्ये जून १९९४ च्या शिक्षकेत्तर भरतीच्या चिपळूणकर आयोगानुसार विद्यार्थी संख्या ५०० ते १००० संख्या असलेल्या शाळेत अर्धवेळ ग्रंथपालांची नेमणूक केली. या अर्धवेळ ग्रंथपालांना पेन्शन योजनेत सहभाग नाही, त्यांची पीएफ कपात होत नाही, घरभाडे भत्ता देत नाही. शासनाने काढलेल्या ३ आॅगस्ट २००६ च्या परिपत्रकानुसार विद्यार्थी संख्या १००० ते १५०० दरम्यान असलेल्या ९२४ माध्यमिक शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल पद निर्माण झाले होते, त्यापैकी फक्त ६३४ शाळांमध्ये ती भरली गेली अन्य शाळांची विद्यार्थी संख्या कमी होत गेल्याने व काहीची सेवा ज्येष्ठतेअभावी ती तशीच अर्धवेळ राहिली.
ग्रंथपालांची पूर्णवेळ पदांवर व्हावी नेमणूक; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:13 PM
राज्यातील सर्वच अर्धवेळ ग्रंथपालांना ३०० विद्यार्थी संख्येवर (केंद्र सरकारी शाळेप्रमाणे) पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर नेमणूक करावी, यासह विविध मागण्या अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथपालांकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देविद्यार्थी संख्या ५०० ते १००० संख्या असलेल्या शाळेत अर्धवेळ ग्रंथपालांची नेमणूकजून १९९४ च्या शिक्षकेत्तर भरतीच्या चिपळूणकर आयोगानुसार निर्णय