शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 7:59 PM

पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेसाठी स्वतंत्र पोर्टलचे मुंबईत उद्घाटनपीएमआरडीए गरजूंसाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित

पुणे : राज्याला सध्या १९ लाख ४०० घरांची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत येत्या दोन वर्षात २.३५ लाख घरे उपलब्ध होतील. पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे. याकरिताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गरजूंसाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे, असे मत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले. पीएमआरडीएच्या प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेला गतिमानता व पारदर्शकता प्राप्त करून देण्याकरिता नागरिकांसाठी ‘माहिती व्यवस्थापन प्रणाली’ (पोर्टल) विकसित केली आहे. मुंबई येथे आयोजित ‘परवडणार घरं परिषद महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवारी प्रकाश मेहता यांच्या हस्ते या प्रणालीचे उदघाटन केले.    एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, संयुक्त सचिव अमरीत अभिजात, आवास व शहरी कार्य मंत्रालय अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, मध्यप्रदेश रेराचे अध्यक्ष अनथोनी दे. सा., पीएमआरडीएचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे उपस्थित होते. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मितीसाठी पीएमआरडीए, मार्फत १४ प्रस्ताव केंद्रीय देखभाल व परवानगी समितीने मंजुरी दिली आहे. मोक्याच्या ठिकाणी २९ हजार ७० परवडणारी घरे निर्माण होणार आहेत. या २९ हजार ७० घरांसाठी अर्ज स्वीकारण्यापासून तर घर हस्तांतरण करण्याची सर्व प्रक्रिया या प्रणालीमधून होईल, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. ..................................या प्रणालीमधून अर्जदाराला स्वत:च्या अर्जाची स्थिती व इतर सर्व बाबींची माहिती पाहण्यासाठी उपयोगी होईल. अर्ज करण्यासाठी तसेच अर्जावरील प्रक्रिया करण्यासाठी पीएमआरडीए अर्जदारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. आर्थिक पिळवणुकीला आळा घालण्यात मदत होईल.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए.............................अर्ज करण्याची पद्धत१) सर्वप्रथम www.pmrdapmay.com संकेतस्थळावरून अर्ज व इतर नमुने डाऊनलोड करून घ्यावे.२) अर्जासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र हे १०० रूपयांच्या मुद्रांकावर असणे अपेक्षित आहे. १०० चा मुद्रांक उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर सुद्धा चालेल व त्यासाठी लागणारा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभ मिळतेवेळी १०० रूपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असेल.३) अर्ज यशस्वीरित्या प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएसद्वारे आॅनलाईन अर्ज क्रमांक पाठवला जाईल आणि सोबतच अर्जाची पोचपावती मिळणार आहे. ..................................घरकुलांसाठी आवश्यक पात्रता   १) प्रत्येक कुटुंब उत्पन्न गटानुसार अर्ज करू शकतात. कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अवलंबित मुले-मुली (अविवाहित).२) कुटुंबाच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे. परंतु स्वावलंबी मुले-मुली (अविवाहित) अर्ज करू शकतात.३) कुटुंबाने किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने या अगोदर कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.४) घरकुल बांधकामासाठी शासकीय खरेदी अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वत: करावी लागेल.५) अर्जदाराच्या नावाचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे व अर्ज सादर करताना बँकेचे आयएफसी कोड असलेले पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्तेPrakash Mehtaप्रकाश मेहताState Governmentराज्य सरकार