काटी : पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत प्राप्त झालेल्या इंदापूर तालुक्यातील सर्व पात्र प्रस्तावांना विशेष मंजुरी दिली असल्याची माहिती अरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली
पुढे माहिती देताना सभापती प्रविण माने म्हणाले कि,पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने महिला व बालकल्याण खात्याअंतर्गत जिल्ह्यातील महिला भगिणी स्वावलंबी व्हावी,व महिलांच्या हाताला ख?्या अथार्ने बळकटी येऊन, महिला सबलीकरण व्हावे या उद्देशाने,खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार इंदापूर तालुक्यात महिला व बालकल्याण खात्याअंतर्गत देण्यात आलेल्या सर्व ह्लपात्रह्व प्रस्तावाला विषेश मंजूरी घेतलेली आहे. इंदापूर तालुक्यातील महिलांनी पुणे जिल्हा परिषदेकडे जेवढे प्रस्ताव पाठवले होते तेवढे सर्वच्या सर्व ह्लपात्रह्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.शेवयानिर्मितीविषयक सर्व प्रस्तावांनाही मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती सभापती प्रविण माने यांनी यावेळी दिली.मंजुरी मिळालेले प्रस्ताव :- ग्रामीण भागातील महिलांना विशेष प्रावीण्य आर्थिक मदत - एकूण लाभार्थी महिलांची संख्या - २१ आहे.- ग्रामीण भागातील महिलांना ब्युटी पार्लरसाठी आर्थिक मदत(ब्युटीपार्लर खुर्ची खरेदीसाठी) - एकूण लाभार्थी महिलांची संख्या - २७- ग्रामीण भागातील महिलांना विशेष प्रावीण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत - एकूण लाभार्थी महिलांची संख्या - ४- ग्रामीण महिलांना शेळी पालनासाठी आर्थिक मदत लाभार्थी महिलांचीसंख्या - ३८८