पुणे : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. जेजुरीतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कशा असतील नविन सुविधा-
यात्रा-उत्सव संबंधित सुविधांचे नियोजन.
जेजुरी शहरातील एतिहासिक वास्तूंचे महत्त्व ओळखून निजोजनामध्ये समावेश.
आपत्ती निवारण मार्गदर्शक तत्वे.
तपशीलवार कामे: राज्य पुरात्त्व खात्याच्या अखत्यारितील
१. खंडोबा मंदिर संकुल-
२. गडकोट
३. दीपमाळा
४. पायरीमार्ग
५. कडे पठार
६. पेशवे व होळकर तलाव, जननी तीर्थ
७. मल्हारगौतमेश्वर मंदिर, लवथलेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मंजुरी मिळाल्याचे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.