लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील कोविड हॉस्पिटलमध्ये (डीसीएचसी / डीसीएच) कोरोनाबाधित रुग्णांसाठी आॅक्सिजन खाटा शिल्लक नसल्याने, कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये दाखल असलेल्या रुग्णांना आता राज्य शासनाने रेमडेसिविर इंजेक्शन वापरास मान्यता दिली आहे़
दरम्यान, ही मान्यता देताना राज्य शासनाने काही नियमही लादून दिले आहे़ यामध्ये ज्या रुग्णांना डीसीएचसी / डीसीएचमध्ये जागा नसल्याने सीसीसीमध्ये ठेवावे लागत असून, संबंधित रूग्णास तेथे आॅक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे़ अशा रूग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन लागू होणार आहे की नाही हे तपासून ते देता येणार आहे़
यामध्ये सर्वात महत्वाचे महत्वाचे म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शन देताना त्या कोविड केअर सेंअरमध्ये ‘एमबीबीएस’ डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे़ तसेच ज्या सीसीसीमधील रूग्ण हे ‘महाराष्ट्र कोविड-१९ टास्क फोर्स’ ने नमूद केलेले रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे निकष पूर्ण करीत आहेत, अशा सीसीसीमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन साठा उपलब्ध करून देण्यास हरकत नाही़ अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ़प्रदीप व्यास यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत़
-------------------------