मंचर : मुख्यमंत्री पेयजल योजनेअंर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या मंचर शहराकरिता १३ कोटी ७२ लाख रुपये किमतीच्या नळपाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवारी (दि. ९) रोजी शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मी मंचर शहराची वाढती लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन पुढील १५-२० वर्षांच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी मंत्रालयीन स्तरावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात स्थानिक शिष्टमंडळासमवेत अनेकदा बैठका घेतल्या होत्या. वेळोवेळी मंत्रालयीन, उच्चस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाºयांसमवेत बैठका घेऊन पत्रव्यवहार करून परिपणर््ूा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर नळपाणी पुरवठा योजनेस मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत दि. ७ मे २०१६ रोजी समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री व प्रधान सचिवांकडे पाठपुरावा केल्याने आजअखेर या महत्त्वाकांक्षी योजनेस अंतिम मंजुरी मिळविण्यास मला यश आले आहे. या योजनेसाठी मंजूर १५ कोटी रकमेपैकी १३ कोटी ७२ लाखांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. यातील उर्वरित १ कोटी २५ लाखांची रक्कमसुद्धा आवश्यकतेनुसार नळपाणी पुरवठ्याच्या कामांकरिताच वापरली जाईल, अशी ग्वाही अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिली असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.मंचर शहर नवीन नळपाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पूर्व प्रधान सचिव राजेशकुमार मीना, अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाचे सर्व संबंधित अधिकाºयांना धन्यवाद. निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.-शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार
मंचरच्या नळपाणीपुरवठा योजनेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 2:36 AM