बारामती : बारामती नगरपरिषदेने यंदा अर्थसंकल्पात नागरिकांना कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामध्ये दरवाढ न करता सन २०१९-२० चा ३९९ कोटी ९४ लाख ४९ हजार ९५७ रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, ३१९ कोटी ९० लाख ८५ हजार रुपये खर्चाचा, तर ३ लाख ६४ हजार ९५७ रुपये शिलकीचा १५३ वा अर्थसंकल्प आज सादर केला. करवाढ नसणाऱ्या अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. २०) बारामती नगरपालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पाच्या तरतुदीमुळे शहराचा कायापालट होणार आहे. महत्त्वाच्या कामांना मंजुरी यामध्ये देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या वेळी विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. या अर्थसंकल्पात आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, उद्यान, तसेच, दिवाबत्ती विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. नीरा डावा कालवा सुशोभीकरण, वॉटर लाईन, प्राथमिक शाळा बांधणे, शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शिवसृष्टी, कविवर्य मोरोपंत यांचे स्मारक बांधणे, राष्ट्रध्वज स्तंभ उभारणे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विकासघरे बांधून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महिलांसाठी सुलभ शौचालय आदींसह विविध विकासकामांचा देखील यामध्ये समावेश आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहर साफसफाईसाठी ५ कोटी ९३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्यान विभागासाठी निसर्गव्रती बारामती योजने अंतर्गत शहरातील लहान मोठी उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात ४ कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात सर्व ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यासाठी ४ कोटी ५८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.सभेदरम्यान गटनेते सचिन सातव यांनी सांगितले, की नगरपरिषदेचा आरोग्य विभागाच्या कर्मचाºयाच्या पायावर चेंबर पडून तो जखमी झाला. जखमी झाला त्या वेळी तो कामावर असूनदेखील त्याला पालिकेने मदत केली नाही. मात्र, सुट्टीच्या दिवशी अपघात झालेल्या अधिकाºयाला पालिकेने पैसे दिल्याचे निदर्शनास आणत प्रशासनाला धारेवर धरले. या विषयावर सातव यांना इतर नगरसेवकांनीदेखील पाठिंबा दिला.नगरसेवक संजय संघवी यांनी गतवर्षी भंगारविक्री झालेली नसल्याचे सांगत हे भंगार पालिकेने कशासाठी ठेवले आहे, असा सवाल करीत वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्याचा विषय मार्गी लावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी संघवी यांनी केली.याशिवाय संघवी यांच्यासह नगरसेवक विष्णुपंत चौधर यांनी संगणक खरेदी व देखभाल दुरुस्तीचा खर्च ४१ हजार रुपयांवरून २५ लाखांवर कसा काय नेण्यात आला, असा सवाल केला. पालिकेच्या स्ट्रीटलाईटवर केलेल्या जाहिरातींचे उत्पन्न नेमके कोणाला मिळते, असा सवाल विरोधी पक्षनेते सुनीलसस्ते यांच्यासह सातव, संघवी,चौधर, गणेश सोनवणे आदींनी केला. पालिका कर्मचाºयांना ओळखपत्र व गणवेश देण्याची मागणी सस्तेयांनी केली.येत्या काळात पालिकेने यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. आरोग्य विभागाकडील गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. नागरिकांसाठी ते सोयीचे ठरणार आहे. पालिकेचा हा अर्थसंकल्प नावीन्यपूर्ण आहे, असे मत गटनेते सातव यांनी व्यक्त केले.अर्थसंकल्प म्हणजे ‘इलेक्शन बजेट ’४आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘इलेक्शन बजेट ’आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान अर्थसंकल्पात दुपटीने दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प गतवर्षीप्रमाणेच १२५ कोटी रुपयांनी फुगविण्यात आला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते सुनील सस्ते व विष्णूपंत चौधर यांनी केली.नका होऊ सांस्कृतिक विकासाचे मारेकरी४बारामती नगरपरिषदेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सामाजिक, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक विकास समाजाला तारी, नका होऊ सांस्कृतिक विकासाचे मारेकरी अशी चारोळीतून प्रतिक्रिया व्यक्त केली. हा अर्थसंकल्प एक नंबर असल्याचे मत देखील गुजर यांनी व्यक्त केले.