पिंपरी : महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी खासगी तत्त्वावर शहारामध्ये सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रांमधून शासनाच्या महाआॅनलाईनकडील उत्पन्नाचे दाखले, रहिवास प्रमाणपत्रासह विविध सेवा उपलब्ध करून देण्यास स्थायी समिती सभेत मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठीच्या सुमारे १ कोटी १४ लाख रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.आज सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. महापालिकेच्या अग्निशामक विभागास आवश्यक बचाव, तसेच सुरक्षा साधने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ९३ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तालेरा व वाय. सी. एम. रुग्णालयातील त्वचा रोग विभागासाठी लागणारी हाय फ्रिक्वेन्सी लो टेम्परेचर रेडिओ सर्जरी मशिन खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ७ लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औष्णिक धुरीकरण करण्यासाठी रिक्षा टेम्पो भाड्याने घेणे आवश्यक असल्याने त्यासाठी येणाऱ्या ६ लाख ४१ हजार रुपयंच्या खर्चासही या वेळी मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)
एक कोटीच्या विकासकामांना मंजुरी
By admin | Published: May 13, 2015 2:59 AM