विद्यार्थी संख्येप्रमाणे संबंधीत पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागाच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी शाळा उशिरा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांना दोन ऐवजी एकच गणवेश मिळणार आहे. प्रथम नववी ते बारावी त्यानंतर पुढे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आता शासन स्तरावर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे.
ग्रामिण व शहरी भागातील जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या इयत्ता पहिली ते अठवी पर्यंतच्या सर्व शाळांना दरवर्षी शासन सर्व जातीच्या मुली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र रेषे खालील मुलांना दोन गणवेशासाठी सहाशे रुपायांचा निधी उपलब्ध करून देते. परंतू, चालू वर्षी कोरोना महामारीमुळे शाळा उशिराने सुरू होत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना एकाच गणवेशासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुलांना लवकरच नवीन गणवेश मिळणार आहे.
कोट
" पुणे जिल्हा परिषदेने माञ ऐतिहासिक निर्णय घेत पुणे जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या व शासनाच्या गणवेश अनुदान योजनेपासुन वंचित असणार्या सर्वच संवर्गातील मुलांसाठी गणवेशासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध करुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणवेश अनुदान योजनेपासुन वंचित राहणार्या सर्वच मुलांना न्याय मिळणार आहे.
- दत्तात्रय वाळुंज, माजी अध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ