शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

पीएमआरडीएच्या १७२२ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 8:02 PM

पीएमआरडीएच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देरिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, हायपरलूपचे काम वेगाने  होणार  पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या २०१९-२०च्या १७२२ कोटी १२ लाख रुपयांच्या अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार आहे, असे मत मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे शुक्रवारी पीएमआरडीएची सहावी प्राधिकरण सभा पार पडली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विकास नियंत्रण नियमावली पुस्तिकेचे अनावरण केले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अपर मुख्य सचिव यु. पी. एस मदान, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.  फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ३ अन्वये पीएमआरडीएमार्फत राबविण्यात येणाऱ्या नगर रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर परवडणारी घरे महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळह्ण सोबत सयुंक्त भागीदारी तत्वावर बांधण्यासाठीच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता मिळाली आहे. पुणे शहर व महानगरातील नागरिकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी प्राधिकरणामार्फत नियोजनात्मक विकास व पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेसाठी एकूण १४ विविध ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उभरणार आहे. त्यासोबत रस्ते, वीज, गटारे आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. हवेली तालुक्यातील वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्ग ९ पासून हडपसर महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र.५६ भाग मांजरी ते रेल्वे गेट ते मांजरी पूल साखळी क्र.३/४४ ते ५/१०० या लांबीमध्ये कॉँक्रीटीकरणाद्वारे (एकूण १३.९१ किमी) चौपदरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामकाजासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. हा रस्ता प्राधिकरणाच्या प्रस्तावित ११० मी. रुंद रिंगरोडच्या पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर रस्त्याला जोडणारा आहे. त्याचप्रमाणे मांजरी, आव्हाळवाडी व वाघोली या तीन टीपी स्कीमकरिता पोच मार्ग आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.................महाराष्ट्र विकास कंपनीत पीएमआरडीएच्या सहभागाला मान्यता पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे विविध भांडवली प्रकल्प राबविताना रस्ते विकास खासगी सहभागातून करण्यासाठी विविध आर्थिक नमुन्यांना पीपीपी या विकल्पावर व इतर तरतुदीसह मान्यता दिली आहे. तसेच पीएमआरडीए हद्दीतील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी निर्मूलन, पर्जन्यजल व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच पुरंदर येथील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता स्थापन करणाºया महाराष्ट्र विकास कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे....................विविध प्रकल्पानिहाय निधी पुढीलप्रमाणे सन २०१९-२०साठीच्या एकूण १७२२ कोटी १२ लाख रुपए इतक्या अंदाजपत्रकीय तरतुदीस मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये आरंभीची शिल्लक ७९४ कोटी रुपए इतकी आहे. त्यामध्ये रिंगरोड प्रकल्पासाठी ५६९ कोटी, नदी सुधार व पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ३५ कोटी, टीपी स्कीममधील विविध विकासकामांसाठी ३२० कोटी, प्राधिकरण क्षेत्रात पूल, सबवे रस्त्याचे काम करण्यासाठी १२५ कोटी, हायपरलूपसाठी ५५ कोटी व इतर योजनावरील खचार्साठी ७७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस