शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

विमानतळ सेवेसाठी पीएमपीकडून मनमानी वसुली

By admin | Published: November 25, 2015 12:46 AM

पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलीत बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकिट वसूली सुरू असल्याची

पुणे : पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलीत बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकिट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बससेवेसाठी निविदा मागवून खासगी कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात असल्याचे कारण पुढे करीत पीएमपी प्रशासनाने या प्रकारणातून हात झटकले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी याबाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे केली असून ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. पीएमपी कडून या मार्गावर सध्या 10 बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.राज्यशासनाने 20 डिसेंबर 2005 मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार, सार्वजनिक वाहतूकीसाठी जास्तीत जास्त किती तिकिटदर आकारता येईल याचे निकष घालून दिले आहेत. त्यानुसार, 22 किलोमीटरसाठी 30 रूपये तर 32 किलोमीटरसाठी 42 रूपये दर निश्चित केलेला आहे. तर ही सुविधा वातानुकूलीत केल्यास त्यासाठी तिकिटावर 150 टक्के सरचार्ज आकारण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या नियमानुसार, पीएमपीएमएल कोथरूड ते विमानतळासाठी 75 रूपये आणि विमानतळ ते हिंजवडी या मार्गासाठी 105 रूपये दर आकारू शकते. पण प्रत्यक्षात कोथरूडसाठी 120 तर हिंजवडीसाठी 180 रूपयांचे तिकिट आकारले जात आहे. त्यामुळे ही तिकिट वसूली अन्यायकारक असून त्याबाबत पीएमपीने खुलासा करण़्याची मागणी केली असल्याचे परिसर संस्थेचे रणजीत गाडगीळ यांनी सांगितले. या बाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे दिली असून सोबत राज्यशासनाच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी आहे. पुणे विमानतळ हे देशातील दहाव्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असून या ठिकाणी पीएमपी कडून केवळ डेक्कन वरून बस सुविधा होती. ती सुविधाही वेळेत नसल्याने प्रवाशांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. (प्रतिनिधी)