बेटवाडी (ता. दौंड) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच डॉ. सुलभा संदीप गावडे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी बसस्टँड, रस्त्याच्या कडेला, मंदिरे, शाळा, स्मशानभूमी व इतर सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ, करंज, गुलमोहर, कडूलिंब, चिंच, आपटा, मिनी बदाम इत्यादी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वेळी वनाधिकारी पद्मिमीनी कांबळे, आरोग्य सेवक डॉ. भीमराव बडे यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गावडे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सत्कारमूर्तींना झाडांचे रोप भेट देण्यात आले. ग्रामस्थांना प्रत्येकी एक झाड रोपणासाठी देण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच रामदास सुर्वे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन सचिन वायसे यांनी केले, आभार डॉ. संदीप गावडे यांनी मानले.
०५ दौंड गावडे
बेटवाडी येथे भीमराव बढे यांचा वृक्ष देऊन सत्कार करताना डॉ. सुलभा गावडे.