घोडेगाव : आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी आदिवासी गावांसाठी व मुलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याचे काम करतात; परंतु प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी आदिवासी विकास विभागात काम करणाºया कर्मचाºयांसाठी तिरंदाजीचा प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे.
दिवसभर टेबल-खुर्चीवर काम केल्याने हात व पाठ ताठ होऊन जातात. प्रत्येक कर्मचाºयाने अर्धा तास तिरंदाजीमध्ये १० बाण सोडले, तर पाठीचा व्यायाम होतो व लक्ष केंद्रित होऊन मेंदूला आराम मिळतो. यामुळे कर्मचाºयांची कामातील गुणवत्ता वाढून चांगले काम होऊ शकते. आदिवासी विकास विभागातील प्रत्येककर्मचाºयाने दिवसातील अर्धा तास हा खेळ खेळला पाहिजे. यासाठी तसा कार्यालयीन आदेशदेखील काढणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रात आदिवासी मुलांसाठी तिरंदाजीचे कुठेही केंद्र नाही. आदिवासी विकास विभागातील कर्मचारी व शिक्षक यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर मुलांसाठीदेखील अशी अॅकॅडमी घोडेगाव येथे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाºयांना हा खेळ शिकता यावा, यासाठी आयुष प्रसाद यांनी कार्यालयातील लेखाधिकारी सी. पी. निसाळ यांना झारखंड येथे आदिवासी मुलांसाठी असलेल्या अॅकॅडमीमध्ये पाठविले. तेथे दीपिका कुमारी यांच्याकडून त्यांनी तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले. आता ते कार्यालयातील इतर कर्मचाºयांना तिरंदाजी शिकविणार आहेत. घोडेगाव येथील आदिवासी मुलामुलींसाठी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिरंदाजीचा पहिला प्रशिक्षण वर्ग झाला. या वेळी निसाळ यांनी कर्मचाºयांना तिरंदाजी शिकविण्याचे थोडक्यात प्रशिक्षण दिले व माहिती सांगितली. या वेळी सहायक प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे, डी. बी. कालेकर आदी उपस्थित होते.