१) आपल्या कर्माप्रमाणे व पाप-पुण्यप्रमाणेच आपल्याला वास्तू लाभत असते.
२) निसर्गात नियमाच्या विपरीत जाऊ नका, अन्यथा फळ भोगावे लागते.
३) आग्नेयकडील खोली स्वयंपाकघर म्हणून वापरता येणे शक्य असते.
४) दक्षिणोत्तर खोलीत शयनकक्ष शक्य असल्यास करावा. शयनकक्षामध्ये दक्षिणेकडे खिडकी आणि बाल्कनी असू नये.
५) वास्तू असलेल्या फ्लॅट स्कीमच्याजवळ स्मशानभूमी नसावी. कारण तसे असल्यास सदनिका ही काही कालानंतर निगेटिव्ह दूषित ऊर्जा होते.
६) फेंगशुई व पिरामिड निवारणासाठी 0% टक्के रिजल्ट असतो. चायनीज वास्तूवर विश्वास ठेवू नका. तीन पायांचा बेडूक, हॅपी मॅन, आदी सर्व चिनी वस्तू असून त्यांना शास्त्राचा आधार नसतो.
७) फ्लॅटच्या चारी दिशा चांगल्या असाव्यात, यासाठी दक्षिण दिशेलर समान ९ भाग करणे. त्यातील पूर्वेकडील व दक्षिणेकडील पहिले २ भाग सोडून तीन व चार भागांमध्ये मुख्य द्वार असल्यास भरपूर उन्नती होते. मात्र, दक्षिणेकडील ७,८,९ भागांमध्ये दरवाजा असल्यास मोठे दुर्घटनाकारक असते.
८) दरवाजा हा पश्चिम आणि वायव्य दिशेस असल्यास चांगले असते. मात्र पश्चिम नैर्ऋत्य त्या दिशेकडे दरवाजा असल्यास दुर्घटना होते.
९) तीन रस्त्यांवरील स्कीममध्ये सदनिका घेऊ नये.
१०) सोसायटीच्या ईशान्य कोपऱ्यात पाणीटाकी अंडरग्राउंड असल्यास चांगली असते. आग्नेय दिशा इलेक्ट्रिकचे खांब, इलेक्ट्रिक डीपीसाठी चांगले असते. आग्नेय दिशेस जनरेटर, गॅस, वायू रूम, अग्नी कोपरा केल्यास खूप चांगले असते.
११) मुख्य द्वाराच्या वरील भागात बीम गर्डर येत असल्यास ती वास्तू घेण्यास टाळावे.
- बाबूलाल जैन (वास्तुतज्ज्ञ)