शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना नगररचनेत ‘नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:36 AM

वास्तुकला व नियोजन अभ्यासक्रमाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांपासून नगररचना अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये (एमटेक - टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग) प्रवेशासाठी ‘नो एंट्री’ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे

पुणे : वास्तुकला व नियोजन अभ्यासक्रमाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांपासून नगररचना अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये (एमटेक - टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग) प्रवेशासाठी ‘नो एंट्री’ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांना आधी पात्रतेत डावलल्यानंतर त्यांचा प्रवेशाचा कोटाही काढून घेण्यात आला. त्यामुळे शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात वास्तुकला व नियोजनच्या केवळ प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे. याविषयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.राज्यात केवळ सीओईपीमध्ये ‘एमटेक-टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग’ हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता केवळ ३१ आहे. त्यामुळे दर वर्षी प्रवेशासाठी चढाओढ असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी वास्तुकलेची पदवी घेतलेले विद्यार्थी पात्र होते. तसेच, प्रवेश देताना वास्तुकला, स्थापत्य आणि नियोजन या तीन पदवी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे ११, १० व १० असा प्रवेशासाठी कोटा महाविद्यालयाने निश्चित केला होता. त्यामुळे तिन्ही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळत होती; पण मागील वर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाच्या पात्रतेत बदल करून वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविले. तसेच, कोटा पद्धत बंद करून एकत्रित गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देण्यास सुरुवात केली.पात्रतेबाबत वास्तुकलेच्या एका विद्यार्थिनीने मागील वर्षी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तिची बाजू ग्राह्य धरून पात्रता कायम ठेवली. मात्र, तरीही यंदा वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अपात्र ठरवून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. मग, यंदाही सहा विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. तसेच, न्यायालयाने कोटा पद्धतीनुसार प्रवेश द्यावेत, असे आदेशात म्हटल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, तरीही डीटीईकडून एकत्रित गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देण्यात आले. यामध्ये स्थापत्यच्या २७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, वास्तुकला व नियोजनच्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला केवळ ४ जागा आल्या आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.याविषयी तंत्रशिक्षण संचालनालयाचे पुणे विभागाचे सहायक संचालक राजेंद्र गायकवाड म्हणाले, ‘‘मागील वर्षी प्रवेशाच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.’’

टॅग्स :Studentविद्यार्थी