पुणे : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अंदाजपत्रकामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. आयुक्तांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे तब्बल ६ हजार ८५ कोटी अंदाजपत्रक गुरुवार (दि.१७) रोजी स्थायी समितीला सादर केले. गेल्या दोन-तीन वर्षांत महापालिकेला उत्पन्नाचा चार हजार कोटीचा टप्पा गाठताना नाकीनऊ येत असताना आयुक्तांकडून उत्पन्न वाढीसाठी कोणतेही ठोस पर्याय न देता अंदाजपत्रक चांगलेच फुगवले आहे.
- १० लाखा पेक्ष अधिक रक्कमेच्या सर्व कामांची सामजिक परिणाम तपासणार
- शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंगरोड सारखे उच्च क्षमता जलद गतीमार्ग ( एच. सी. एम. टी.आर.) प्रकल्पाला गती देणार ,
- एच.सीएमटीआर रस्त्यासाठी २११ कोटींची तरतुद
- सन २०३० अखेर पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात ५०० ईलेक्ट्रीक व ८५० सीएनजी बस खरेदी करणे
- पुणे शहरामध्ये पुढील पाच वर्षात ८२४ किलो मिटरचे सायकल ट्रॅक टप्प्या-टप्प्याने विकसित करणार, अंदाजपत्रकात २४ कोटी रुपयांची तरतुद
- शहरात प्रायोगित तत्त्ववार दिल्ली सरकारच्या धर्तीवर पाच शाळा मॉडले स्कूल विकसित करणार
- सामाजिक विकास विभागा अंतर्गत शाहर अंधांसाठी आॅडियो लायब्ररी सुरु करणार
- शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब आणि संगीत वर्ग सुरु करणार
- व्यवसायिक प्रशिक्षणासाठी ७ नवीन लाईट हाऊस उभारणार
- शहरातील महापालिकेच्या ३४ इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प
- शिवसृष्टी प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार
- प्रधानमंत्री आवास योजने अतंर्गत शहरात २१ हजार घरे बांधणार, घरांचे वाटप २०१९-२० मध्येच सुरु करणार
समाविष्ट गावांसाठी अंदाजपत्रकात काय
- समाविष्ट २३ गावांचा लोकल एरिया प्लॅन करणार
- नव्याने समाविष्ट ११ गावातील बांधकामे अधिकृत करणार
- ११ गावांमध्ये नवीन टीपी स्कीम राबविणार
- समाविष्ट गावांचा ईएलयु जाहीर करणार
आरोग्य विभागासाठी २४६.२६ कोटीची तरतुद
- शहरात महापालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र बर्न वॉर्ड सुरु करणार
- आणखी ३ ठिकाणी डायलिसीस सुविधा देणार
उद्यान विभाग ९७.१२ कोटी
- कोथरूड परिसरात डहाणुकर कॉलनी येथे ‘बोलणारी झाडे’ हा खास प्रकल्प
- हिंगणे खुर्द येथे ४ एकरच्या तुकाई माता उद्यानात लिली आणि रॉक पार्क
- वडगाव शेरी येथे दिव्यांगाकरिता अडथळा विरहीत उद्यान विकसित करणार
वाहतुक नियोजन व प्रकल्प : २५२.०९ कोटी तरतुद
- सिंहगड रस्ता धायरी फाट वाय आकाराचा जंक्शन पूल बांधणे
- औंध सांगावी रस्त्यावर नवा आणखी एक पूल बांधणे
- राजाराम पूल येथे आर्ट प्लाझा
- हडपसर आणि रामटेकडी येथे भुयारी मार्ग. बोपोडी चौकात भुयारी मार्ग
- वडगाव शेरी येथील नवीन पार्किंग तळ विकसित करणार
- शहरातील जुन्या १२ पुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करणार
- शहरातील शंभर किलोमीटरचे रस्ते पाहिल्या टप्प्यात सुरक्षित करणार
- १४०० किलोमीटर रस्त्याचे रोड असेंट मॅनेजमेंट सिस्टम नुसार रस्त्याचा बदल करणार
- शंभर किलोमीटर रस्त्यावर स्मार्ट स्ट्रीट करणार