पुणे : राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पुण्यातील खालकर चौकात मारुतीरायाची महाआरती आणि हनुमान चालिसापठण केले. आज दुपारी मनसेच्या नवी पेठ येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन मोठ्या घोषणा कारण्याबरोबरच भोंगे आणि मिरवणुकीच्या विषयवार भाष्य केले आहे. राज ठाकरेंच्या ३ मेच्या अल्टिमेटमनंतर एमआयएमकडूनही छेडेंगे तो छोडेंगे नही असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी आमचे हात काय बांधलेले आहेत का? आम्हालाही दगड हातात घेता येतो असे उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत दिले आहे.
राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडून मिरवणुका निघत असतात, त्यावर दगडफेक होत असतील. तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नसून आम्हालाही दगड हातात घेता येतो. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एमआयएमकडून (mim) छेडेंगे तो छोडेंगे नही असा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. तर आमचे हात काय बांधलेले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
भोंग्याचा त्रास मुस्लिमांनाही
राज ठाकरे म्हणाले की, "इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय."
नाहीतर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू
भोंग्यांचा हिंदूंना त्रास होतोय अस नाही. पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा लावू. महाराष्ट्रात व देशात आम्हाला दंगली नको. शांतता भंग करायची नाही. मुस्लिम बांधवाना वाटत असेल तर आम्ही ते करू. त्यांनी प्रामाणिकपणे भांगे कडून टाकावेत. मुस्लिम बांधवानी आमचे ऐकवे आणि भोंगे काढून टाकावेत. नाहीतर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.