शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

कानगावला शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

By admin | Published: December 19, 2015 3:02 AM

कानगाव येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील साईकृपा साखर कारखान्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी अर्धनग्न उपोषण केले.

पाटस : कानगाव येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील साईकृपा साखर कारखान्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी अर्धनग्न उपोषण केले. साईकृपा कारखान्याने येथील जवळपास १०० शेतकऱ्यांचे उसाचे बिल न दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या साखर कारखान्याला शेतकऱ्यांचे बिल देण्यासाठी शासनाच्या माध्यमातूनच प्रयत्न होणार आहेत. कारण, मोठ्या मेहनतीने उसाचे पीक घेतले, त्यातच पैसे मिळणार नसतील तर या भागातील शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत जावे लागणार असल्याची भीती उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तेव्हा शासनाने याकामी तातडीने पुढाकार घेऊन या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली. तहसीलदार उत्तम दिघे, यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अजय गोरड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित कांबळे, मंडलाधिकारी भालेराव यांनी उपोषण स्थळी भेट दिली. कानगावला आज शासनाचा दशक्रियाविधीकानगाव येथील शेतकऱ्यांची हेळसांड करणाऱ्या साईकृपा कारखाना व्यवस्थापनाची गय केली जाणार नाही. जर शासन साईकृपा कारखान्याला पाठीशी घालत असेल, तर शासनाला त्याची किंमत मोजावी लागेल. याचा एक भाग म्हणून कानगाव गावात शनिवारी (दि. १९) शासनाचा दशक्रियाविधी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली होती. याचा विचार शासनाने करावा, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी सांगितले.