शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
2
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
3
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
6
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
7
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
8
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
9
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
10
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
11
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
12
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
13
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
14
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
15
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
16
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
17
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
18
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
19
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
20
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 2:45 PM

अजित पवार यांनी माध्यमांकडून देण्यात येत असलेलं वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.

Ajit Pawar Pune ( Marathi News ) :राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाइल्सवर केल्या जाणाऱ्या सह्यांवरून वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, "माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये आम्ही सर्वजण एकोप्याने काम करत आहोत. मागे पण काही जणांनी चुकीची बातमी दिली की मी वेशभूषा आणि नाव बदलून दिल्लीला गेलो होतो. मी कशाला नाव बदलू? आई-वडिलांनी मला इतकं सुंदर नाव ठेवलं आणि मला माझ्या नावाचा अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी परवा जळगावच्या कार्यक्रमात एकत्र गेलो, नंतर मुंबईलाही एकत्र आलो. मात्र विरोधकांना आता कोणतंही काम उरलं नसल्याने त्यांच्याकडून वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे," असा पलटवार अजित पवारांनी केला आहे.

कॅबिनेट बैठकीत काय घडलं? नेमकी काय चर्चा सुरू?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईल्सवरील सह्यांवरून मोठा वाद झाल्याचं बोललं जात आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याने त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईल्सवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी संघर्षाच्या चर्चा फेटाळल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकार