इशाक इकबाल, एन विजय सुंदर प्रशांत यांचे आव्हान संपुष्टात
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अर्जुन कढे, मनीष सुरेशकुमार या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, इशाक इकबाल, एन. विजय, सुंदर प्रशांत, देव जाविया यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढेने विजयी मालिका कायम ठेवत चेक प्रजासत्ताकच्या डोमिनिक पॅलनचा टायब्रेकमध्ये १-६, ७-६ (४), ७-६(५) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना २ तास ५९ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये डोमिनिकने सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये अर्जुनची सर्व्हिस ब्रेक केली. या सेटमध्ये डोमिनिकने वर्चस्व राखत अर्जुनची पाचव्या गेममध्ये अर्जुनची पुन्हा सर्व्हिस रोखली व हा सेट ६-१ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या अर्जुनने तिसºया गेममध्ये सर्व्हिस रोखली व बरोबरी साधली. त्यानंतर १२व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये अर्जुनने हा सेट ७-६ (४) असा जिंकून आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी असताना नवव्या गेममध्ये डोमिनिकने अर्जुनची, तर पुढच्याच गेममध्ये अर्जुनने डोमिनिकची सर्व्हिस ब्रेक केली. टायब्रेकमध्ये अर्जुनने हा सेट ७-६ (५) असा जिंकून विजय मिळवला.
स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाने भारताच्या क्वालिफायर पारस दहियाचा ६-१, ५-७, ७-५ असा तीन सेटमध्ये पराभव केला. हा सामना २ तास ४८ मिनिटे चालला. सहाव्या मानांकित भारताच्या मनीष सुरेशकुमार याने हंगेरीच्या झोंबर वेल्जचे आव्हान ३-६, ७-६ (५), ६-४ असे संपुष्टात आणले.
अन्य लढतीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित झेन खानने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या एन. विजय सुंदर प्रशांतचा ६-३, ७-५ असा पराभव केला. ग्रेट ब्रिटनच्या तिसऱ्या मानांकित एडन म्युकुकने भारताच्या इशाक इकबालचा ६-१, ६-३ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या मानांकित आर्यलँडच्या सिमॉन कारने स्वीडनच्या फिलीप बर्गेव्हीचा ६-२, ७-६ (७) असा पराभव केला. अमेरिकेच्या चौथ्या मानांकित आॅलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या देव जावियाचा ४-६, ६-१, ६-२ असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या अन्वित बेंद्रे व परीक्षित सोमाणी या जोडीने एस. डी. प्रज्वल देव व नितीनकुमार सिन्हा यांचा ६-७, ६-४, १०-७ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : दुसरी फेरी: एकेरी : पुरुष :
सिमॉन कार (आर्यलँड) [२] वि.वि. फिलीप बर्गेव्ही (स्वीडन) ६-२, ७-६ (७);
झेन खान (अमेरिका) [८] वि.वि. एन विजय सुंदर प्रशांत (भारत) ६-३, ७-५;
एडन म्युकुक (ग्रेट ब्रिटन) [३] वि.वि. इशाक इकबाल (भारत) ६-१, ६-३;
जोनाथन म्रीधा (स्वीडन) [५] वि.वि. पारस दहिया (भारत) ६-१, ५-७, ७-५;
हेनरी पॅटन (ग्रेट ब्रिटन) वि.वि. डालीबोर सेव्हर्सिना (चेक प्रजासत्ताक) ४-६, ६-४, ६-१; अर्जुन कढे (भारत) [७] वि.वि. डोमिनिक पॅलन (चेक प्रजासत्ताक) १-६, ७-६ (४), ७-६ (५); मनीष सुरेशकुमार (भारत) [६] वि.वि. झोंबर वेल्ज (हंगेरी) ३-६, ७-६ (५), ६-४; आॅलिव्हर क्रॉफर्ड (अमेरिका) [४] वि.वि. देव जाविया (भारत) ४-६, ६-१, ६-२;
दुहेरी गट : उपांत्यपूर्व फेरी :
अन्वित बेंद्रे (भारत) / परीक्षित सोमाणी (भारत) वि.वि. एस. डी. प्रज्वल देव (भारत) / नितीन कुमार सिन्हा (भारत) (१०) ६-७, ६-४, १०-७;
सिमॉंन कार (आर्यलँड) / अलेक्झांडर कोटझेन (अमेरिका) वि.वि. फैजल कुमार (भारत) / ध्रुव सुनिश (भारत) ५-७, ६-१, १०-६;
झेन खान (अमेरिका) / डालिबोर सेव्हर्सिना (चेक प्रजासत्ताक) वि.वि. फिलीप बर्गेव्ही (स्वीडन) / जोनाथन म्रीधा (स्वीडन) [३] ६-१, ६-४.