शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

उरुळी कांचनमधील बिवरी येथे घरावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 12:55 PM

घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देऊन अंगावरील दागिने ओढून काढून घेतले

उरुळी कांचन: बिवरी ता. हवेली जि. पुणे येथे मंगळवारी (ता. ०२) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख  रक्कम लुटली आहे.  बिवरी  हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले गाव आहे. शहर पोलिसांसमोर या ग्रामीण भागामध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान आहे. याप्रकरणी प्रशांत विलास गोते (वय ४०) रा. बिवरी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दरडोखरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.      लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत गोते आणि त्यांचे कुटुंब रात्री जेवण करून घरामध्ये झोपले असता मध्यरात्री पावणेदोन च्या सुमारास सात अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आल्या. त्यांनी मुख्य दरवाजा कटावणीने तोडून उघडला व शस्त्रासह आत घुसले आवाजाने सर्व कुटुंब जागे झाले परंतु सर्व कुटुंबीयाना चाकू व शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी घरातील बेडरूम मधील कपाटातून ५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देऊन अंगावरील दागिने ओढून काढून घेतले. तसेच त्यांच्या बहिणीला मारहाण करण्यात आली आईला तोंडाला जबर मारहाण करून कानाला तोंडाला दुखापत दरोडेखोरांनी केली. घरातील व्यक्तींनी पोलिसांना फोन करू नये म्हणून सर्वांचे मोबाईल फोडून टाकले दरोडेखोरांनी १६ लाख ३० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडा घालून चोरून नेली व आरोपी पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांना व पोलीस पाटील यांना फोन करावा. - पोलीस पाटील बिवरी ,सागर गोते.

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीHomeसुंदर गृहनियोजन