चाकण : सराईत गुन्हेगारांकडून कंपनीत शिरून धाडसी सशस्त्र दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. कुरुळी या कंपनीत हा प्रकार घडला. म्हाळुंगे पोलिसांनी याप्रकरणी सात सराईत पुरुषांसह २ महिला अशा एकूण नऊ दरोडेखोरांच्या सोमवारी ( दि. २८ जुन ) मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. दरोडेखोरांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
रोहन विजय सूर्यवंशी ( वय - २८, रा. विठोबा कॉम्प्लेक्स, कासारवाडी, पुणे), राहुल अंकुश शिरसागर ( वय - २१, रा. काळाखडक, मज्जित जवळ वाकड, पुणे,), रतन दनाने ( वय - १९, रा. काळोखेवाडी, तळेगाव दाभाडे, पुणे.), अब्दुल सत्तार अब्दुल करीम ( वय - २३, रा. पवारवस्ती, दापोडी, पुणे.), अन्सार जुल्फिकार खान ( वय - २५, रा. एस. एम. एस. कॉलनी, दापोडी, पुणे.), अरबाज रईस शेख ( वय - २६, रा.एस. एम. एस. कॉलनी, दापोडी, पुणे.), मोहन लाल भट ( वय - २४,रा. साने चौक, चिखली, पुणे.), मीना अंकुश शिरसागर ( वय ४२, रा. काळा खडक जवळ, वाकड, पुणे.) व विद्या मनोज मगर ( वय - २३, रा. काळोखेवाडी, तळेगाव दाभाडे, पुणे.) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
येथील पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाकण एमआयडीसीतील कुरुळी ( ता. खेड, जि. पुणे,) गावच्या हद्दीत व्ही. टेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे. या कंपनीत शुक्रवारी ( दि. २५ जून ) मध्यरात्री तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान वरील सर्व दरोडेखोर कंपनीच्या कंपाउंड वॉलवरून हातामध्ये चाकू, कटावणी, तसेच घातक हत्यारे घेवून शिरले. तेथील सिक्युरिटी गार्डच्या तोंडावर मिरचीची पूड टाकून त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून अंगावर चादर टाकून त्याना दाबून ठेवले. व कंपनीतील तांबे, पितळ, वायरिंग, हार्नेस, आणि सिक्युरिटी गार्डचे ३ मोबाईल फोन असे एकूण २५ लाख, ८७ हजार, २४७ रुपयांचा दरोडा टाकून मुद्देमाल लुटून नेला.
वरील सर्व दरोडेखोरांवर चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्या सर्वांना जेरबंद करण्यात आले. म्हाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी ही माहिती दिली. संबंधित दरोडेखोरांनी कंपनीतील माल लुटण्यासाठी क्रीम रंगाचा टेम्पो वापरल्याची माहिती सिक्युरिटी गार्डकडून प्राप्त झाली होती. परंतु सदर टेम्पोच्या नंबरवर कागद लावून नंबर झाकण्यात आल्याने नंबर प्राप्त झाला नसल्याने कंपनीचे आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये टेम्पोचे नंबरचा अंदाज बांधून वाहन पोर्टलवर नंबरची पडताळणी केली असता एका टेम्पोचा नंबर समजला. याबाबत टेम्पो वाहन मालकाची माहिती प्राप्त करून त्याच्याकडे तपास करण्यात आला. सदर संशयित टेम्पो मालकाकडून प्राप्त माहितीवरून वरील दरोडेखोर कंपनीतून लुटलेला माल विक्री कारण्यासाठी यमुनानगर निगडी परिसरात गेले असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चार तासात दरोडेखोरांचा शोध घेवून त्यांनी कंपनीत लुटलेला माल ते एका गोडाऊनमध्ये विक्री करत असतना त्यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांच्या मध्ये झालेल्या झटापटीत दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांकडून २५ लाख, ७५ हजार, ५४७ रुपयांचे तांबे पितळ या धातूची स्पेअर पार्ट, ४ लाख रुपयाचा अशोक लेलँड टेम्पो ( क्र. एम. एच.१४, जी.डी. ७८२७ ), २ लाख, ९० हजार रुपयाचे एक पल्सर मोटर सायकल, एक हिरो होंडा स्प्लेंडर, मोटर सायकल, ६७ हजार रुपयांचे ७ मोबाईल फोन, तसेच पंधराशे रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, साडे सहाशे रुपयांची एक लोखंडी कटावणी, तीन चाकू व मिरची पूड असा एकूण ३३ लाख, ३४ हजार, ६९७ रुपये किमतीचा मुद्देमाल ह्स्तगत केला. किरण गिरी ( नाव, पूर्ण पत्ता माहिती नाही.) व हर्षद खान यांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे मंचक इप्पर, पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, दशरथ वाघमोडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, सुरेश यमगर, चंद्रकांत गवारी, राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामण सांगडे, शरद खैरे, प्रीतम ढमढेरे, जयकुमार शिकारी, साहेबराव टोपे, सोनम खंडागळे आदींनी केली. पोलीस उपनिरीक्षक महेश चित्तमपल्ली हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
म्हाळुंगे इंगळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले दरोडेखोर.