शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:26 PM

अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एकतानगरी आणि निंबजनगर भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसायटीमध्ये घराघरात पाणी शिरल्याचे दिसून आले आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सिंहगड रोड परिसरात एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत.   एकतानगरी आणि निंबजनगर भागात प्रशासनाकडून बोटीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढले जात आहे. अग्निशमन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेऊन  बोट, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग अशा विविध उपकरणांचा वापर करत नागरिकांना सुरक्षित स्थळी आणले जात आहे. ११ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने जवळपास १६० नागरिकांची सुखरुप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. सिंहगड रस्ता निंबज नगर भागातून  ७० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोड वरील सोसायट्या मध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली असताना त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.

आता अग्निशमन आणि एनडीआरएफ या दोन्ही जवानांच्या मदतीने नागरिकांची सुटका केली जात आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच खडकवासला धरणातून विसर्ग सुरु असल्याने पाणी बघण्यासाठी अथवा वर्षाविहारासाठी कोणीही पुलांवर जाऊ नये असेही सांगण्यात येत आहे.    

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसRainपाऊसTemperatureतापमानPoliceपोलिसForceफोर्सenvironmentपर्यावरण