नारायणगावातील ग्रामस्थांना सरपंच योगेश पाटे यांनी आवाहन केल्यानुसार पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू आज (दि. २७) महाड, चिपळूण भागात पाठविण्यात आले. या वेळी युवक नेते सुजित खैरे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष दांगट, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, उपसरपंच पुष्पा आहेर, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, ज्योती दिवटे, संतोष पाटे, रुपाली जाधव, सुप्रिया खैरे, गणेश पाटे, अनिल खैरे, दिपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, आशिष माळवदकर, विकास तोडकरी, हेमंत कोल्हे, अजित वाजगे, निलेश दळवी आदी उपस्थित होते.
--
३० नारायणगाव शिवसेनेची मदत
फोटो ओळी : ग्रामपंचायत नारायणगाव व शिवसेना शाखा यांच्या वतीने महाड, चिपळूण या पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्याचे कट्टे व इतर जीवनावश्यक वस्तू पाठविताना.