पुणे : कोरोना विषाणूमुळे देशात गेल्या ३९ दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा विषाणू पसरू नये तसेच त्याला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, परिचारीका, पोलीस दिवस रात्र झटत आहेत. स्वत:च्या जिवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता त्यांनी दिलेल्या सेवेमुळे देशांत रूग्णांची संख्या कमी आहे. या कोरोना वॉरियर्संनी केलेल्या त्यागाचा, बलिदानाचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे रविवारी करण्यात आला.
कोरोना या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्यावर मात करण्यासाठी सर्व देश एकत्र आला आहे. विषाणूविरोधातील या लढाईत कोरोना योध्यांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत मानवतेच्या भवितव्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. कोरोना वॉरियर्सच्या या कर्तव्याचे, त्यांचे धैर्य, नि:स्वार्थ त्यागाचे आणि समर्पणाचे कौतुक सर्व देश करत आहे. त्यांच्या या कार्यामुळे कोरोना विरोधात असलेली लढाई आपण जिंकू शकतो. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्याात आला होता.
डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल फोर्सेस, स्वच्छता कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि जीवनावश्यक पुरवठा सेवा कर्मचा-यांमुळे देशातील नागरिक येत्या काळात सुरक्षित राहू शकणार आहे. या कठीण परिस्थीतीत त्यांनी २४ तास झटून काम केले आहे. त्यांच्या चिकाटीमुळे आणि मेहनतीमुळेच भारतात कोरनोचा प्रसार नियंत्रित करण्यास यश आले आहे, असा विश्वास लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी व्यक्त केला. देशात लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सरकार प्रयत्नात असताना, दक्षिणी मुख्यालय सर्व कोरोना योद्धांनाना प्रेरित करण्यासाठी त्यांचे आभार मानत असल्याचेही मोहंती म्हणाले.
पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका कार्यलय या सोबतच शहरातील सर्व पोलीस चौक्या, दवाखाने या ठिकाणी जात तेथील कर्मचा-यांचा सत्कार लष्करी अधिका-यांनी केला. महापालीकेत सफाई कर्मचा-यांसोबत केक कापत या काळात शहराची स्वच्छता त्यांनी राखल्याने त्यांच्या कार्याचे कौतूक लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती यांनी केले.
काेराेना याेध्यांमुळे काेराेनाच्या प्रसाराचा वेग कमी कोरोना विरोधी लढ्यात कोरोना योध्यांनी मोठे धैर्य दाखवले आहे. त्यांच्या या कार्यामुळे भारतात कोरोना प्रसाराचा वेग कमी होऊ शकला आहे. या कठीण परिस्थीतीत त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. आपल्या देशातील सर्व नागरिकांकडून हे योध्ये नक्कीच कौतुकाचे पात्रता आहे.आम्ही दक्षिणी मुख्यालयातील सर्व सैन्य अधिकारी आणि सदस्य, राष्ट्रासाठी नि:स्वार्थ योगदान दिल्याबद्दल शूरवीर कोरोना वॉरियर्स यांना सलाम करतो आहोत.- लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती, कमांडन्ट दक्षिण मुख्यालय